ट्रायथलॉन स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

  • By admin
  • January 30, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

महिला संघ अजिंक्य, तर पुरुष संघाला उपविजेपद

हलद्वानी : महाराष्ट्राच्या ट्रायथलॉन संघाने अखेरच्या दिवशी ड्यूयोथलॉन प्रकारात एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचा षटकार झळकावत सर्वसाधारण विजेतेपदावर मोहोर उमटवली.

वैयक्तिक ड्यूयोथलॉनमध्ये (२.५ किलो मिटर धावणे, २० किलो मिटर सायकलिंग व पुन्हा २.५ किलो मिटर धावणे) डॉली पाटीलने ५७.५३ मिनिटात शर्यत पूर्ण करून रुपेरी यश मिळविले. या शर्यतीत मानसी मोहितेने ५९.५६ मिनिटात शर्यत पूर्ण करून कांस्य पदक पटकावले.

ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्राने ६ पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपदाही गवसणी घातली. उद्घाटनापूर्वी दोन सुवर्ण पदके जिंकून महाराष्ट्राच्या ट्रायथलॉन संघाने सारे लक्ष वेधून घेतले होते. स्पर्धेत २ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य अशी एकूण ६ पदके जिंकून स्पर्धेत अजिंक्यपदाचा ठसा उमटवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *