
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस पब्लिक स्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ रोहिदास गाडेकर यांची देहरादून (उत्तराखंड) येथे होत असलेल्या ३८ नॅशनल गेम्स स्क्वॉश खेळासाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
डॉ रोहिदास गाडेकर हे आंतरराष्ट्रीय पंच अधिकारी परीक्षा उत्तीर्ण आहेत. आतापर्यंत पंधरा राष्ट्रीय शालेय स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मुख्याध्यापिका गीता दामोदर, संचालक रणजीत दास, किरण चव्हाण, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर, महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे, सचिव डॉ दयानंद कुमार, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, डॉ कल्याण गाडेकर, डॉ कैलास शिवणकर, अर्चना गाडेकर आदींनी अभिनंदन केले आहे.