
नागपूर : संताजी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन क्राॅस कंट्री स्पर्धेत कौशिक तुमसरे आणि खुशबू क्षीरसागर यांनी विजेतेपद पटकावले.
आमदार गोविंदराव वंजारी स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा नुकतीच संताजी महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे घेण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी ८ किलोमीटर आणि विद्यार्थिनींसाठी ५ किलोमीटर अंतर होते.
प्राचार्या डॉ प्रिया वंजारी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मुलांच्या गटात कौशिक तुमसरे याने विजेतेपद पटकावले. क्रिश पवनीकर याने द्वितीय क्रमांक मिळवला. आलोक शर्मा याने तृतीय, विवेक गौपाले याने चौथा क्रमांक मिळवला. संताजी कॉलेजच्या संकेत ढगे याने पाचवा क्रमांक संपादन केला.
मुलींच्या गटात दयानंद आर्य कन्या कॉलेजची खुशबू क्षीरसागर हिने अजिंक्यपद मिळवले. सुमन शाहू आणि उज्वला पराते हे दयानंद आर्य कन्या महाविद्यालयाच्या सुमन शाहू, उज्वला पराते यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. संताजी महाविद्यालयाची राजकुमारी धुर्वे ही चौथ्या स्थानावर राहिली. प्रतीक्षा बेद्रे हिने पाचवा क्रमांक मिळवला. प्रतीक्षा ही दयानंद आर्य कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
क्राॅस कंट्री स्पर्धा महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ संजय खळतकर यांच्या नेतृत्वात झाली. क्राॅस कंट्री स्पर्धा आयोजनासाठी प्राचार्या डॉ प्रिया वंजारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्राध्यापक डॉ मीना बालपांडे आणि अन्य महाविद्यालयातील प्राध्यापकांसह, इतर क्रीडा विभाग प्रमुख या क्राॅस कंट्री स्पर्धेत उपस्थित होते. महाविद्यालयातल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य लाभले.