
रावेर : जागतिक तायकॉन असोसिएशन व भारतीय तायक्कोन असोसिएशन यांच्या सौजन्याने पहिली आशियाई तायक्कोन स्पर्धा पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण पंधरा संघांचा समावेश झाला होता. भारतीय संघाने एकूण १५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कांस्य अशी ऐतिहासिक कामगिरी केली. आशियाई स्पर्धेत भारत चॅम्पियन ठरला.
स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे हे उपस्थित होते. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक राजभाऊ गोरडे, उद्योजक पप्पू भाऊ जासूद हे उपस्थित होते, केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा ताई खडसे व केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
तसेच हेमंत रासने, भीमराव तापकीर, शंकर जगताप, सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील आपल्या शुभेच्छा दिल्या.
भारतीय संघाचे प्रशिक्षक डॉ उमेश पाटील व सर्व खेळाडूंचे अभिनंदन आमदार सुरेश भोळे यांनी केले. तसेच जागतिक तायक्कोन फेडरेशनचे अध्यक्ष जु उन्ग सेंओ तसेच भारतीय तायक्कोन संघटनेचे सचिव राज वागदकर व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. दिलीप वेडे पाटील यांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत पंच म्हणून प्रशांत गायकवाड, शब्बीर पठाण, अशोक शिंदे, चंचल बेदवे, निलेश पाटील, कुणाल शिंदे, नंदकिशोर बुरडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच व्यवस्थापन संतोष बसवंते, लक्ष्मण उदमले, मिलिंद काटमोरे, किरण पालकर यांनी जबाबदारी पार पाडली.