
राज्य शालेय रस्सीखेच स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर : आंतर शालेय राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत मुलांच्या गटात अमरावती आणि नागपूर तसेच मुलींच्या गटात मुंबई व नागपूर विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या तांत्रिक सहकार्याने व महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली रस्सीखेच असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे आयोजित विभागीय क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय शालेय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १४, १७, १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात घेण्यात आली.

पारितोषिक वितरण रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार किशोर पाटील, माजी नगरसेवक राज वानखेडे, निवृत्त अभियंता सुनील देशपांडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, भारतीय रस्सीखेच संघटनेचे कोषाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघटनेचे सचिव डॉ जनार्दन गुपिले, शशी निलवंत, जिल्हा संघटनेचे गोकुळ तांदळे, जिल्हा संघटनेचे सचिव फकीरराव घोडे, सुरेश फूके, डॉ राहुल वाघमारे, प्रमोद खरात, बाबा गायकवाड, खंडूराव यादव, गणेश बेटूदे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा रस्सीखेच संघटनेतर्फे सर्व विजयी खेळाडूंना मेडल्स देण्यात आली व पंचाना स्मृतीचिन्ह देण्यात आले. अंतिम सामन्यांसाठी पंच म्हणून डॉ राहुल वाघमारे, डॉ सतीश खरटमल, शुभम भोकरे, प्रदीप थोरात, सुभाष कुरें, शिवाजी जाधव, भीमा मोरे आदींनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रफिक जमादार, राकेश खैरनार, संतोष अवचार, सचिन बोर्डे, गौरव साळवे, निखिल वाघमारे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व राज्य संघटना, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.
अंतिम निकाल
१४ वर्षांखालील मुले : १. अमरावती, २. नाशिक, ३. मुंबई.
१७ वर्षांखालील मुले : १. नागपूर, २. अमरावती, ३. मुंबई.
१९ वर्षांखालील मुले : १. नागपूर, २. अमरावती, ३. मुंबई.
१४ वर्षांखालील मुली : १. मुंबई, २. नागपूर, ३. छत्रपती संभाजीनगर.
१७ वर्षांखालील मुली : १. नागपूर, २. मुंबई, ३. पुणे.
१९ वर्षांखालील मुली : १. नागपूर, २. नाशिक, ३. अमरावती.