
छत्रपती संभाजीनगर : गडचिरोली येथे होणाऱ्या आंतर शालेय राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पधेसाठी देवगिरी महाविद्यालयाचा मुला-मुलींचा संघ स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.
देवगिरी महाविद्यालयाच्या दोन्ही संघांनी जिल्हा तसेच विभागीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या कामगिरीने देवगिरी महाविद्यालयाचे दोन्ही संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. ही स्पर्धा ४ ते ६ फेब्रुवारी या दरम्यान चामोर्शी गडचिरोली शासकीय विज्ञान महाविद्यालय येथे होणार आहे. मुलींच्या संघात पायल लेले, अन्वी अग्रवाल, उन्नती आधाने, शगुन रणदिवे, तन्वी डाके यांचा समावेश आहे. मुलांच्या संघात यजत खोसे, जयश पाटील, आर्यन माळी, किरण नरोडे, विपुल लोंढे या खेळाडूंचा समावेश आहे.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, कार्यकारणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर, प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य एन जी गायकवाड, उपप्राचार्य सुरेश लिपाने यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रा राकेश खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मंगल शिंदे, अमोल पगारे, कृष्णा दाभाडे, शुभम गवळी, शेख शफीक यांनी सहकार्य लाभले आहे.