
छत्रपती संभाजीनगर : नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सतर्फे सिक्स विक सर्टिफिकेट कोर्स डिसेंबर-जानेवारी दरम्यान पतियाळा (पंजाब) येथे घेण्यात आला. या परीक्षेत देशभरातून एकूण ४८ जणांनी कोचिंग सर्टिफिकेट कोर्ससाठी सहभाग नोंदविला होता. त्यात छत्रपती संभाजीनगरच्या संतोष आवचार आणि अमृता शेळके यांनी यश संपादन केले आहे.
महाराष्ट्रातील संतोष आवचार, अमृता शेळके (छत्रपती संभाजीनगर), रेश्मा पुणेकर (पुणे), मंजुषा पगार (नाशिक), धनंजय शिरसाठ (जालना) या एकूण ५ जणांचा सहभाग होता. त्यात ४८ पैकी टॉपमध्ये प्रथम विमल कुमार (केरळ), द्वितीय अनुज कुमार (दिल्ली), तृतीय संतोष आवचार (महाराष्ट्र), तृतीय कमल कौर (पंजाब), तृतीय अजय सिंग (जम्मू कश्मीर) यांनी स्थान मिळवले.
छत्रपती संभाजीनगरचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक संतोष चंद्रकांत आवचार याने अ ग्रेड घेऊन तिसरा क्रमांक प्राप्त केला. तर अमृता सुनील शेळके ही या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.
संतोष आवचार व अमृता शेळके हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अनुक्रमे तिसरे आणि चौथे सॉफ्टबॉल खेळाचे एनआयएस प्रशिक्षक आहेत. दोघांनाही पतियाळा या ठिकाणी भारतीय सॉफ्टबॉल तांत्रिक समितीचे आणि प्रशिक्षक मुकुल देशपांडे यांचे प्रशिक्षण लाभले.
संतोष आवचार हे सध्या पिसादेवी रोड हर्सूल येथील रायजिंग स्टार स्कूल येथे तर अमृता शेळके या गायकवाड ग्लोबल स्कूल येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल दोन्ही प्रशिक्षकांचे भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटना सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष डॉ फुलचंद सलामपुरे, सचिव गोकुळ तांदळे, डॉ उदय डोंगरे, डॉ पंढरीनाथ रोकडे, डॉ दयानंद कांबळे, डॉ संदीप जगताप, रायजिंग स्टार स्कूलचे अध्यक्ष सुभाष निकम, सचिव अरुण निकम, मुख्याध्यापिका दीपाली वाकळे, उपमुख्याध्यापक संदीप चव्हाण, स्वाती निकम, दीपक रुईकर, राकेश खैरनार, प्रवीण शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सागर रूपवते, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, गणेश बेटूदे, अजित झा, स्वप्नील गुडेकर, सचिन बोर्डे, भीमा मोरे आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.