क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बेवन, हेडचा सन्मान

  • By admin
  • February 4, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

मेलबर्न : ‘द फिनिशर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मायकेल बेवन याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड याला प्रतिष्ठित अॅलन बॉर्डर पदक देऊन सन्मानित केले आहे.

एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या मायकेल बेवनचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. बेवन हा ऑस्ट्रेलियाच्या १९९९ आणि २००३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. एकदिवसीय सामन्यांमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याने २३२ सामन्यांमध्ये ५३.५८ च्या प्रभावी सरासरीने ६९१२ धावा केल्या.

५४ वर्षीय बेवन याने १९९४ मध्ये एकदिवसीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि २००४ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. दरम्यान, त्याने ऑस्ट्रेलियासाठी फिनिशरची भूमिका चांगली बजावली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक्सवर पोस्ट करत माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू मायकेल बेवन याचे क्रिकेट ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केल्याबद्दल अभिनंदन केले.

हेड बॉर्डर पुरस्काराचा मानकरी
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेटपटूच्या प्रतिष्ठित अ‍ॅलन बॉर्डर पदकासाठी तर युवा अष्टपैलू अ‍ॅनाबेल सदरलँडला सर्वोत्कृष्ट ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूसाठी बेलिंडा क्लार्क पदकाने सन्मानित केले. गेल्या वर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये १,४२७ धावा करून शानदार कामगिरी करणाऱ्या हेडने २०८ मतांसह सर्वोच्च सन्मान जिंकला. त्याने जोश हेझलवूड (१५८ मते) आणि पॅट कमिन्स (१४७ मते) यांना हरवले. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याच्या पहिल्या कसोटी शतकानंतर काही दिवसांतच, सदरलँडला हा पुरस्कार मिळाला, हा त्याचा पहिला ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार होता. मेलबर्न क्रिकेट मैदानावर शतक करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *