
फाईट व पुमसे प्रकारात १३ सुवर्ण, ६ रौप्य, ४ कांस्य पदकांची कमाई
जळगाव : दुसऱ्या जैन चॅलेंज ट्रॉफी तायक्वांदो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल संघाने चमकदार कामगिरी नोंदवत दुहेरी मुकुट संपादन केला. अनुभूती स्कूलने या स्पर्धेत १३ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य अशी २३ पदकांची कमाई केली.
अनुभूती निवासी स्कूल येथे जैन चॅलेंज ट्रॉफी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २४ शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या खेळाडूंनी फाईट प्रकारात ९ सुवर्ण, ५ रौप्य, ३ कांस्य पदके जिंकली. पुमसे प्रकारात ४ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई करत घवघवीत यश प्राप्त केले. पहिल्यांदाच एवढ्या पदकांची कमाई केल्याने अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबासिस दास यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.
फाईट प्रकारात साची पाटील, समीक्षा पवार, अनुभूती चौधरी, भव्या अग्रवाल, सन्निधी राकीबे, चार्वी शर्मा, याज्ञी मोहिते, भाविका पाटील, समृद्धी कुकरेजा, दिया देशपांडे, जानव्ही जैस्वाल, पलक सुराणा, अलफिया शाकिर, अदिती कुकरेजा, स्तुती गर्ग, किंजल धर्मशाली, मुक्ती ओसवाल, शाहनी जैन यांनी पदक विजेती कामगिरी नोंदवली आहे.
पुमसे प्रकारात अनुभूती चौधरी, समीक्षा पवार, साची पाटील, समृद्धी कुकरेजा, दिया देशपांडे, पलक सुराणा यांनी घवघवीत यश संपादन केले. पुमसे प्रकारात १४ वर्षांखालील वयोगटात अनुभूती चौधरी हिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. १७ वर्षांखालील गटात समृद्धी कुकरेजा ही उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
जैन स्पोर्ट्स अकादमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, राज्य तायक्वांदो असोसिएशनचे सदस्य अजित घारगे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.