
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते किट, ट्रॅकसूटचे वितरण
मुंबई : भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ४६व्या वरिष्ठ महिला व पुरुष राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते खेळाचे किट व ट्रॅकसूट देण्यात आले.

थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे भोपाळ येथे राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नाशिक येथे महा थ्रोबॉल संघटनेतर्फे राज्यस्तरीय महिला व पुरुष निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा उत्कृष्ट महिला व पुरुष संघ निवडण्यात आला.
या स्पर्धेच्या दरम्यान महा थ्रोबॉल संघटनेचे मुख्य आश्रयदाते माजी खासदार अशोक नेते (गडचिरोली), महा थ्रोबॉल संघटनेचे अध्यक्ष दर्शील मनोज कोटक (मुंबई), कार्याध्यक्ष मुरलीधर मुरारकर (नागपूर), उपाध्यक्ष चंद्रकांत निर्भवणे, दिनेश अहिरे, डॉ. राकेश तिवारी, महा थ्रोबॉल संघटनेचे महासचिव राहुल वाघमारे यांनी निवडलेल्या संघास शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे महिला व पुरुष संघ भोपाळ येथे आयोजित स्पर्धेकरिता रवाना होताना महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व सर्व खेळाडूंना खेळाचे किट व ट्रॅकसूट प्रदान केले. आमदार किरण सामंत यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोमल वाकडे (चंद्रपूर), चिरंजीवी कट्टा (हिंगोली), अमर भांडारवार (नागपूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा महिला संघ
समीक्षा शेट्टे, कृतिका मोरे, ईश्वरी कोरडे, पूर्वा बांगर, ईशा खुडजकर, विद्या बांगर, पल्लवी सरकटे, अनन्या गायकवाड, साजिया खान, त्रिशा खरवार, कनिष्का गडगे, सानिका धमाल, शलाका बर्वे.
महाराष्ट्राचा पुरूष संघ
अतुल गडगे, नयन मोरे, वैभव मोरे, युवराज रासल, वेदांत शिंदे, प्रथम पवार, गितेश घुले, अभिषेक डोडे, अनुश सांयल, मुकुंद तापासे, आर्य शिकारी, मंदार खर्डे, रितेश कांबळे, मारूती गारुडे.