
सातारा (नीलम पवार) : उत्तराखंड राज्यात सुरू असलेल्या ३८व्या नॅशनल गेम्समध्ये सातारा येथील आंतरराष्ट्रीय तिरंदाज आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त आदिती स्वामी हिने ७०८ गुणांसह विक्रम रचला.
कंपाऊंड प्रकारात आदिती स्वामी, मधुरा धामणगावकर, पूर्वशा शेंडे आणि प्रीतिका प्रदीप यांच्या टीमने २१०० गुण घेऊन नॅशनल गेम्समध्ये नवीन विक्रम रचला. या स्पर्धेत संघ व्यवस्थापक प्रवीण गडदे, संघ मार्गदर्शक प्रवीण सावंत, कुणाल तावरे, अमर जाधव, समीर म्हस्के यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
या शानदार कामगिरीबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, महासचिव नामदेव शिरगावकर, तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.