
जालना : महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेतर्फे राज्य सब ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन येत्या २३ व २४ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे करण्यात आले आहे. या राज्य स्पर्धेसाठी जालना संघाची निवड करण्यासाठी ८ फेब्रुवारी रोजी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य अॅथलेटिक्स स्पर्धा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे आयोजित केली आहे. जालना जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, रेल्वे स्टेशन रोड, जालना येथे करण्यात आले आहे.
१४ वर्ष वयोगटासाठी ८० मीटर व ३०० मीटर धावणे लांबउडी व गोळा फेक, १२ वर्ष वयोगटासाठी ६० मीटर व ३०० मीटर धावणे लांबउडी व गोळा फेक, १० वर्ष वयोगटासाठी ५० मीटर व १०० मीटर धावणे लांबउडी व गोळा फेक व ८ वर्ष वयोगटासाठी ५० मीटर व १०० मीटर धावणे लांबउडी असे प्रकार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी जन्माचा अधिकृत दाखला व आधार कार्ड सोबत आणावे,असे आवाहन जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रा बाबू यादव, प्रमोद खरात, एकनाथ सुरुशे, संतोष मोरे, विकास काळे यांनी केले आहे.
अधिक महितीसाठी ९४२३१५७८५३ या क्रमांकावर संपर्क साधावा.