
सोलापूर : निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत युनायटेड क्रिकेट क्लबने पहिल्या डावाच्या आघाडीवर एनजीसीए क्रिकेट अकादमी संघावर विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना युनायटेडने पहिल्या डावात ५१.२ षटकात सर्व बाद १८१ धावा केल्या. त्यात कबाडे ४७, संभाजी शिंदे ३८ व हर्षद विजापूरने २४ धावा केल्या. पार्थ राठोडने १७ धावात ३, ऋग्वेद पाटीलने ६ धावात २, सोहम कुलकर्णीने १६ धावात २ तर श्रवण माळी, अनुज वाल्मिकी व आनंद शेंडे यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
प्रत्युत्तरात एनजीसीएने पहिल्या डावात २४.३ षटकात सर्वबाद ७९ धावा केल्या. त्यात रणवीर सिंग बुमरा २४, पार्थ राठोड २४ व कृष्णा चाकोतेने ११ धावा केल्या. आरशाद विजापूरने १९ धावात ४, सम्राट बोबडेने ६ धावात २ बळी तर निखिल माळीने २४ धावात १ बळी टिपले.
युनायटेडने दुसऱ्या डावात ६५.२ षटकात सर्व बाद १६३ धावा केल्या. त्यात हर्षदीप साठे ५६, संभाजी शिंदे ३५, हर्षद विजापूरे १६ व श्रीराज गवळीने १३ धावा केल्या. आनंद शेंडेने २२ धावात ४ बळी, सोहम कुलकर्णीने ३० धावात ३ बळी व अनुज वाल्मिकीने १० धावात २ गडी बाद केले.
एनजीसीएने दुसऱ्या डावात ४१ षटकात ७ बाद १६७ धावा केल्या. यात आनंद शिंदे नाबाद ७१, सोहम कुलकर्णी ५९, पार्थ राठोड १२ व यशराज टेकाळे नाबाद १४ धावा केल्या. सम्राट बोबडेने १७ धावात २, यश लोंढेने १९ धावात २ तर संभाजी शिंदे व गवळीने प्रत्येकी एक बळी टिपले.
पंच म्हणून चिराग शहा व प्रवीण कुलकर्णी तर गुणलेखक म्हणून गणेश पवार यांनी काम पाहिले. पुष्प जिमखाना डोणगाव रोड येथे एनजीसीए विरुद्ध युनायटेड क्रिकेट क्लब यांच्यामध्ये दोन दिवशीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या तीन सामन्याची मालिका सुरू झाली. याचे उद्घाटन सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन १४ वर्षाखालील निवड समिती चेअरमन राजेंद्र गोटे, निवृत्त पोलीस उपायुक्त रावे, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी एनजीसीए कोच निलेश गायकवाड व युनायटेड क्लब कोच चंद्रकांत लोखंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू गायकवाड यांनी केले.
वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट फलंदाज : संभाजी शिंदे, गोलंदाज : आनंद शेंडे, सामनावीर : आनंद शेंडे.