
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शाळेचा गौरव
सातारा (नीलम पवार) : दरवर्षी जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सन २०२३-२४ या वर्षांतील १४ वर्षांखालील वयोगटामध्ये आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलने प्रथम क्रमांक संपादन केला. जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे रुपये ८३ हजार ५४० रुपये प्रोत्साहन अनुदान शाळेला प्राप्त झाले.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियल स्कूलला प्रोत्साहन अनुदानाचा धनादेश प्रदान करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशणी नागराजन, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांची उपस्थिती होती.
यासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संघटक, सचिव, सहसचिव, विभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी, शाळेच्या प्राचार्या मेघा संदीप पवार, उपप्राचार्या, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व क्रीडा शिक्षक धनश्री गायकवाड, रसिका सापते, अनिता गायकवाड व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.