
राज्य सचिव डॉ मकरंद जोशी यांची तांत्रिक समिती सदस्य म्हणून निवड
छत्रपती संभाजीनगर : उत्तराखंड राज्यात सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या १६ खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात करण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू जिम्नॅस्टिक्सच्या विविध प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या स्पर्धेकरिता छत्रपती संभाजीनगर शहरातील एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये १४,ॲक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरिता २, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरिता १ तसेच टब्लिंग आणि ट्राम्पोलिंग खेळाडूंची महाराष्ट्र संघामध्ये निवड करण्यात आली होती. ही निवड त्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या कामगिरी बघता त्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे करिता संघामध्ये आपले स्थान प्राप्त केले.
ही स्पर्धा उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असून जिम्नॅस्टिकच्या पाचही प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन देहरादून येथे केले आहे. जिम्नॅस्टिकच्या स्पर्धा ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत या स्पर्धेकरिता डॉ मकरंद जोशी यांची तांत्रिक समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. तसेच पंच म्हणून अमेय जोशी, डॉ रणजीत पवार, सिद्धार्थ कदम व प्रशिक्षक म्हणून संजय मोरे, हर्षल मोगरे, प्रवीण शिंदे, ईशा महाजन यांची निवड करण्यात झाली आहे.
या संघाला महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ आदित्य जोशी, सचिव डॉ मकरंद जोशी, कोषाध्यक्ष आशिष सावंत, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या उपसंचालक डॉ मोनिका घुगे, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ रणजीत पवार, सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ सागर कुलकर्णी, डॉ विशाल देशपांडे, रोहित रोंघे, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, साईचे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे, पिंकी डे, राज्य शासन क्रीडा मार्गदर्शक तनुजा गाढवे यांनी प्रशिक्षक व खेळाडूंना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी अनिकेत चौधरी, गौरी ब्रह्मणे, दीपक अर्जुन, विश्वेश पाठक, पार्थेश मार्गपवार, आर्या शाह, मानसी देशमुख, उदय मधेकर, श्रीपाद हराळ, स्मीत शाह, रामदेव बिराजदार, अभय उंटवाल, संदेश चिंतलवाड, साक्षी डोंगरे, शुभम सरकटे, रिद्धी जैस्वाल, रिद्धी हत्तेकर व आयुष मुळे या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.