वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

  • By admin
  • February 7, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

मुंबई : ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले.

गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर संघावर सात गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबई उपनगर कडून जस्टीन याने सर्वात अधिक १५ धावा, तर सिद्धांत याने १४ धावा केल्या. सूर्योदय आरबीएल स्कूलच्या अनुज त्रिपाठी याने एकाच षटकात दोन गडी बाद केले.

५६ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना सूर्योदय आरबीएल स्कूलचा पहिला गडी रोहन गुटाल शून्य धावांवर बाद झाला. पण नंतर अनुज त्रिपाठी याने १५ धावा केल्या. त्याला रोहित पोथेन आणि ओबेद डायस यांनी १०-१० धावा करून सुरेख साथ दिली. लवेश डऊल याने सहा धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अनुज त्रिपाठी याला उत्कृष्ट गोलंदाज व सर्वाेत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले . उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार ओबेद डायस याला देण्यात आला. विजयी संघातील सर्व खेळाडूंचे तसेच क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिक्षक शंकर परब, स्टेफी व महिमा यांचे प्रिन्सिपॉल अनुसया प्रधान यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *