संतोष आवचार, ईश्वरी शिंदे यांची महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात निवड

  • By admin
  • February 7, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

गणेश बेटूदे यांची संघ व्यवस्थापकपदी निवड

छत्रपती संभाजीनगर : उत्तर प्रदेश सॉफ्टबॉल असोसिएशन द्वारा आयोजित १६व्या वरिष्ठ वेस्ट झोन सॉफ्टबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात संतोष आवचार व ईश्वरी शिंदे या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. गणेश बेटूदे यांची पुरुष संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चौधरी चरणसिंग युनिव्हर्सिटी मेरठ येथे ही स्पर्धा होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू खेळाडू संतोष चंद्रकांत आवचार याची महाराष्ट्र पुरुष संघात आणि ईश्वरी शिंदे हिची महाराष्ट्र महिला संघात निवड करण्यात आली आहे. तसेच गणेश बेटूदे यांची पुरुष संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाली आहे.

या निवडीबद्दल भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष आणि राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, राज्य संघटना सहसचिव गोकुळ तांदळे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष डॉ फुलचंद सलामपुरे, डॉ उदय डोंगरे, दीपक रुईकर, तेजरावजी बहुदेशिय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष निकम, सचिव अरुण निकम, रायजिंग स्टार स्कूलच्या मुख्याध्यापिका दीपाली वाकळे, उपमुख्याध्यापक संदीप चव्हाण, स्वाती निकम, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, सागर रूपवते, सचिन बोर्डे, अजित झा, स्वप्नील गुडेकर, भीमा मोरे आदींनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *