
अंशुका निघुटकर मालिकावीर पुरस्काराची मानकरी
नागपूर : डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल अँड स्पोर्ट्स अकादमी, मिहान येथे नुकत्याच झालेल्या मुलींच्या क्रिकेट लेदर बॉल स्पर्धेत लोकमत प्रीमियर लीगमध्ये एसओएस बेलतरोडी संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. अव्वल शाळांच्या संघांविरुद्ध स्पर्धा करत एसओएस बेलतरोडी संघाने उपविजेतेपद पटकावले.
कर्णधार अंशुका निघुटकर हिच्या नेतृत्वाखालील संघात हृदया देशपांडे, सिद्धी हरोडे, अद्विका गजभिये, अनुक्ति वर्मा, साराक्षी हडके, दिदन्या बनसोड, प्रियांशी अडकिने, आरोही बावनकर, समिधा एन, अधिरा एम आणि स्वरा आर यांचा समावेश होता. खेळाडूंचा दृढनिश्चय आणि सांघिक कामगिरीच्या बळावर त्यांनी उपविजेतेपद संपादन केले. अंशुका निघुटकरला तिच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी ‘वुमन ऑफ द सिरीज’ म्हणून घोषित करण्यात आले.
संपूर्ण स्पर्धेत एस्कॉर्ट शिक्षिका चारुशीला शेट्टीवार आणि सतीश भालेराव यांनी संघाला मार्गदर्शन केले. शाळेला अभिमान वाटावा अशा या अपवादात्मक कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ उमा भालेराव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.