
सोलापूर : सूर्यनमस्कार स्पर्धेत अवंती शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उपविजेतेपद संपादन केले.
रथसप्तमी निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक मंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत संस्थेच्या ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व तीन हजार रुपये असे पारितोषिक मिळाले. या खेळाडूंना रतिकांत म्हमाणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
विजेत्या खेळाडूंचा सत्कार अवंती शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप साठे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी लोकमंगल माध्यमिक प्रशाला अवंती नगरच्या मुख्याध्यापिका शुभांगी साठे उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख, अवंती शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक अभयसिंह साठे यांनी अभिनंदन केले.