
नागपूर : नागपूरच्या अंजुमन इंजिनिअरिंग कॉलेज संघाने तिरपुड क्रेसेन्डो टग ऑफ वॉर चॅम्पियनशिप जिंकली.
अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या टग ऑफ वॉर पुरुष संघाने कर्णधार सौरभ कनोजिया आणि प्रशिक्षक डॉ झाकीर खान यांच्या मार्गदर्शनाखाली रामदेवबाबा युनिव्हर्सिटी टग ऑफ वॉर आंतर महाविद्यालयीन चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवत विजेतेपद पटकावले.
विजेत्या अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी संघात सौरभ कनोजिया, गुफ्रान सिद्दीक, फराज काझी, सुमित गजभिये, अमर खान, आर्यन आवळे, शशांक चवरे, फरहान मन्सुरी, प्रेम बामनेले, अमान अन्सारी या खेळाडूंचा समावेश आहे.
तिरपुडे मॅनेजमेंट कॉलेज कॅम्पस येथे आयोजित बक्षीस वितरण डॉ के एस अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य झाकीउद्दीन यांनी अंजुमन टग ऑफ वॉर विजेत्या संघाचा सत्कार केला. अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे टग ऑफ वॉर प्रशिक्षक आणि शारीरिक शिक्षण उपसंचालक डॉ झाकीर एस खान यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रात लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.