
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा हँडबॉल संघटनेतर्फे सीनियर हँडबॉल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर मुलांच्या संघाची निवड चाचणी रविवारी (९ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आली आहे.
वसंतराव नाईक महाविद्यालय क्रीडांगणावर रविवारी सकाळी ९.३० वाजता निवड चाचणीस सुरुवात होईल. या निवड चाचणीतून चंद्रपूर येथे १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या ५०व्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सीनियर संघ निवडण्यात येणार आहे. या निवड चाचणीत खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव प्रभाकर भारसाखळे, केजल भारसाखळे, डॉ सचिन पगारे, संजय सातदिवे, उज्वला सातदिवे, डॉ तादलापुरकर आणि कोषाध्यक्ष डॉ सत्यजित पगारे यांनी केले आहे.