नॅशनल गेम्स : महाराष्ट्राचा टेबल टेनिस संघ सज्ज 

  • By admin
  • February 8, 2025
  • 0
  • 52 Views
Spread the love

सिद्धेश पांडे, दिया चितळे यांच्याकडे नेतृत्व 

मुंबई : उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय खेल स्पर्धेत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या टेबल टेनिस स्पर्धेकरीता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. दिया चितळे (मुंबई उपनगर) आणि सिद्धेश पांडे (ठाणे) यांच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. 

निवडण्यात आलेले हे दोन्ही संघास महेंद्र चिपळूणकर, सुनील बाब्रास यांच्या मार्गदर्शनात ठाणे येथे सराव शिबीर घेण्यात आले आहे. निवडण्यात आलेला हा संघ विमानाने स्पर्धेकरीता उत्तराखंडला दाखल झाला आहे, अशी माहिती राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतिन टिपण्णीस यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघास राज्य अध्यक्ष प्रवीण लुंकड, ॲड आशितोष पोतनीस, संजय कडू, महाराष्ट्र ऑलिम्पिक सरचिटणीस नामदेव शिरगावकर,  सुनील पूर्णपात्रे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राचा पुरुष संघ : दीपित पाटील (ठाणे), चिन्मय सोमय्या (मुंबई उपनगर), जश मोदी (मुंबई उपनगर), सिद्धेश पांडे (ठाणे), रेगन अल्बुकर्क (मुंबई उपनगर). प्रशिक्षक : महेंद्र चिपळूणकर. व्यवस्थापक : राम कोनकर (पुणे). 

महाराष्ट्राचा महिला संघ : स्वस्तिक घोष (रायगड), दिया चितळे (मुंबई उपनगर), तनीशा कोटेचा (नाशिक), रीथीशय टेनिसशन (मुंबई उपनगर), सायली वाणी (नाशिक). प्रशिक्षक : सुनील बाब्रास (पुणे). व्यवस्थापक :  गणेश माळवे (परभणी). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *