जिम्नॅस्टिक्सच्या एक्रोबॅटिक व एरोबिक्स प्रकारात महाराष्ट्र अंतिम फेरीत

  • By admin
  • February 8, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

देहरादून : गतवर्षी पाच सुवर्णपदकांसह गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजविणाऱ्या महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही जिम्नॅस्टिक्समध्ये धडाकेबाज सुरुवात केली. एक्रोबॅटिक व एरोबिक्स या दोन्ही प्रकारात महाराष्ट्राने अंतिम फेरी गाठून आपला दबदबा कायम ठेवला.

भागीरथी संकुलात शनिवारपासून जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, हरियाणा व कर्नाटक या पाच राज्यातील संघ सहभागी झाले आहेत. महिला दुहेरीत ऋतुजा जगदाळे आणि निक्षिता खिल्लारे या जोडीने बॅलन्स सेटमध्ये नेत्रदीपक रचना सादर करून २१.११० गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला. 

पुरुष दुहेरीत गणेश पवार व आदित्य कालकुंद्रे ही जोडी २१.७५० गुणांसह दुसरा स्थानावर राहिली. मिश्र दुहेरीत शुभम सरकटे व रिद्धी जयस्वाल जोडीने सर्वाधिक १९.०१० गुणांची कमाई केली. 

महिला गटात सोनाली कोरडे, आर्णा पाटील व अक्षता ढोकळे या महाराष्ट्राच्या त्रिकुटाने २२.३९० गुणांची कमाई करीत अपेक्षेप्रमाणे अव्वल स्थान मिळविले. पुरुष गटात रितेश बोखडे, प्रशांत गोरे, नमन महावर व यज्ञेश बोस्तेकर या जोडीने सर्वाधिक २३.६७० गुणांसह प्रथम स्थान मिळवीत महाराष्ट्राचा दरारा कायम ठेवला.

एरोबिक्स प्रकारातही महाराष्ट्राचाच दबदबा बघायला मिळाला. या प्रकारातही महाराष्ट्राने महिला दुहेरी, पुरुष दुहेरी, मिश्र दुहेरी, महिला गट व पुरुष गटात नेत्रदीपक कामगिरी करीत सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. मिश्र दुहेरी श्रीपाद हराळ व मानसी देशमुख या जोडीला १५.१५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

मिश्र तिहेरी गटात आर्य शहा, स्मित शहा व रामदेव बिराजदार या त्रिकुटाने १६.२५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. पुरुष गटात संदेश चिंतलवाड, स्मित शहा, अभय उंटवाल, उदय मधेकर, विश्वेश पाठक यांनी १५.८० गुणांसह पहिले स्थान मिळवित महाराष्ट्राचे वर्चस्व प्रस्तापित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *