
पुणे : कोकणस्थ परिवार पुणेतर्फे अंध क्रिकेट मधील विश्वविजेत्या भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अमोल करचे याची महाराष्ट्र शासनाने मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी प्रशिक्षण वर्ग (१) म्हणून नेमणूक केल्याबद्दल पुण्याचे एक्सडीजीपी अॅड विजय सावंत यांचे हस्ते पंडित नेहरू स्टेडियम पुणे येथे खास सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना अमोल करचे हा भावुक झाला होता. अमोल म्हणाला की, ‘मी पुण्यात आल्यापासून मला माझ्या खेळात सदैव प्रोत्साहन कोकणस्थ परिवार पुणे यांनी दिले. अगदी माझे निवास, भोजन सारख्या प्राथमिक गरजांबाबत काळजी घेतली आणि मदतीचा हात सदैव पुढे केला मला आज जे काही यश मिळत आहे त्याबद्दल मी कोकणस्थ परिवार पुणे यांचा सदैव ऋणी राहील. अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.’
या कार्यक्रमास बॉक्सिंग प्रशिक्षक दत्ता शिंदे, डॉ मंजू जुगदर, प्रा कुशाबा पिंगळे, अॅड सागर कुळकर्णी, पवन नेवरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकणस्थ परिवारचे अध्यक्ष ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर हे होते. सचिव पराग गानू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.