
रावेर : अश्वमेघ क्रीडा स्पर्धेसाठी श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाच्या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
२६ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धा १८ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे होणार आहे. या क्रीडा महोत्सवासाठी श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर येथील चार खेळाडूंची निवड कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात झाली आहे.
विद्यापीठ संघात तुषार सूर्यवंशी, मानसी पाटील, प्रीती ढाकणे आणि ऋतिका इंगळे अशा चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष हेमंत नाईक, संस्थेचे डॉ प्रतीक नाईक, प्राचार्य डॉ अनिल पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस यु पाटील, प्रा संदीप धापसे, प्रा लीलाधर नेमाडे, क्रीडा समिती सदस्य प्रा नरेंद्र घुले, प्रा चतुर गाडे, डॉ नीता जाधव, क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.