नेरळ येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी कबड्डी प्रशिक्षण शिबीर

  • By admin
  • February 11, 2025
  • 0
  • 57 Views
Spread the love

मुंबई : सचिंद्र आयरे फाऊंडेशनने विद्या विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर यांच्या सहकार्याने विनामूल्य कबड्डी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. १२ व १३ फेब्रुवारी असे दोन दिवस चालणारे हे शिबीर ब्राम्हण आळी, नेरळ, ता. कर्जत, जिल्हा रायगड येथे होईल.

या शिबिराची वेळ सकाळी ९ ते ११ आणि दुपारी ४ ते ६ अशी आहे. शिबीर दोन सत्रात होईल. वय वर्ष ९ ते १४ याच वयोगटातील निवडक मुलांना शिबिरात सहभाग घेता येईल. या शिबिरात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तारक राऊळ, पुणेरी फलटणचे माजी व दिल्ली दबंगचे फिटनेस ट्रेनर संग्राम मांजरेकर, डायटिशन दीपाली मुसळकर, मधुकर आयरे (योगा व आहार) मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मुख्याध्यापिका विनया काकडे, मुख्याध्यापिका शैलजा निकम तसेच फाउंडेशनचे सचिव सचिंद्र आयरे यांनी एका संयुक्त पत्राद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *