< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे गोविंद शर्मा यांचा सत्कार – Sport Splus

बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे गोविंद शर्मा यांचा सत्कार

  • By admin
  • February 12, 2025
  • 2
  • 109 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : पहिल्या जागतिक विश्वचषक खो-खो स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे खजिनदार तसेच विश्वचषक खो- खो स्पर्धेचे भारतीय निवड समिती सदस्य गोविंद शर्मा यांचा बजाजनगर स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने बजाजनगर येथे सत्कार करण्यात आला.

नवी दिल्ली येथे पहिली जागतिक खो-खो स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत भारतीय खो-खो संघांचे निवड समिती सदस्य व आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून जबाबदारी अगदी काटेकोरपणे व ग्रामीण भागातील खेळाडूंना न्याय देणारे व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मराठवाड्यातील गोविंद शर्मा यांचा सत्कार सोहळा बजाजनगर स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. बजाजनगर स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा कैलास जाधव, सचिव शेख शफी, कोषाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, कार्याध्यक्ष रामेश्वर वैद्य, राजर्षी शाहू विद्यालयाचे अध्यक्ष विकास गवई, मार्गदर्शक दत्ता पवार, उपाध्यक्ष अण्णा चव्हाण, सहसचिव नारायण शिंदे, संचालक समाधान हराळ, करण लघाने, प्रमोद गुंड आणि परिसरातील क्रीडा शिक्षक, खेळाडू, पालक या प्रसंगी उपस्थित होते.

गोविंद शर्मा यांनी खेळाडूंना क्रीडा विषय व जागतिक स्पर्धेतील अनुभव खेळाडूंना सांगून विद्यार्थ्यांनी खेळाकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे, खेळल्याने शरीर व बुद्धी चंचल बनते, अशा विविध टिप्स दिल्या. कैलास जाधव यांनी ग्रामीण भागातील खेळाडू जास्तीत जास्त तयार करून पुढील होणाऱ्या जागतिक स्पर्धा असेल किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल त्या संघात वाळूज पंचक्रोशीतील खेळाडू त्या संघात नेतृत्व करेल असे आश्वासन दिले.

2 comments on “बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे गोविंद शर्मा यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *