
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर फुटबॉल संघटनेतर्फे फुटबॉल निवड चाचणीचे आयोजन १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता अर्बन टर्फ ग्राऊंड एन ६ सिडको वर्ल्ड स्कूलच्या बाजूला येथे करण्यात आले आहे.
या निवड चाचणीतून निवडण्यात येणारा संघ हा वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित २० वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. ही स्पर्धा मार्च महिन्यामध्ये होणार आहे. या स्पर्धेमधून महाराष्ट्र राज्याचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे.
या स्पर्धेसाठी एक जानेवारी २००६ ते ३१ डिसेंबर २००८ या कालावधीमध्ये खेळाडूचा जन्म झालेला पाहिजे. निवड चाचणीसाठी येताना खेळाडूने ओरिजनल बर्थ सर्टिफिकेट व ओरिजनल आधार कार्ड सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे. त्याशिवाय त्यांना निवड चाचणीमध्ये सहभाग घेता येणार नाही. अधिक माहितीसाठी रउफ खान, मझर बाबर शेख, इरफान खान, शेख उमेर सिकंदर आणि शेख साहिल यांच्याशी संपर्क साधावा.
या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन उमर खान, अशपाक खान, खलिल पटेल, बदर चाऊस, स्टीवन डिसूजा, रंजीतसिंह भारद्वाज यांनी केले आहे.