
नागपूर : श्री संताजी शिक्षण विकास संस्था द्वारा संचालित संताजी महाविद्यालयातील हर्षल विजय सितापुरे याने वर्ल्ड कप चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके जिंकून स्पर्धा गाजवली.
महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणाऱ्या हर्षल सितापुरे याने फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड कप चॅम्पियनशिप स्पर्धेत १८ ते १९ वयोगटात कुमिते प्रकारात सुवर्णपदक तर काता प्रकारात रौप्य पदक मिळवले. ही स्पर्धा पेडडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, करासवाडा, सापुसा, गोवा येथे संपन्न झाली. हर्षल याला प्राचार्या डॉ प्रिया वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले असून क्रीडा विभाग प्रमुख डॉ संजय खळतकर यांचे सहकार्य लाभले आहे.