
छत्रपती संभाजीनगर : श्री महाबली हनुमान बहुउद्देशिय शिक्षण संस्था संचालित सोहम इंग्लिश स्कूलचे बारावे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले.
तापडीया नाटयमंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून सातारा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्य इंग्लिश भाषा प्रमुख डॉ सतीश सातव व प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ शिराणे, प्रेमसागर लोहिया, अरविंद पाटील, श्रीमती तारे, सुनील मगर पाटील, संदीप लघामे पाटील, चंद्रहंस गुंड, शांभवी देशपांडे, अश्विनी बडाख, संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा आव्हाळे, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण आव्हाळे, उपमुख्याध्यापक प्रवीण राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही वार्षिक स्नेहसंमेलनाची मुख्य थीम होती. या थीमवर आधारित कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ व मोबाईल, सोशल मीडिया व २१व्या शतकातील कौशल्य या विषयावर नाटिका सादर करण्यात आले.
स्वगत गीत, मणिपूर, भरतनाट्यम, राजस्थानी गरबा, महाराष्ट्रीयन खंडोबा व देवीचा जागरण गोंधळ, साऊथ कांन्तारा, आई मला खेळायला जाऊ दे, पंजाबी भांगडा, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज पोवडा, ऑलिम्पिक स्पोर्ट्स, लेझीम या गाण्यावर विद्यार्थ्यांनी सुंदररित्या नृत्य सादर केले व प्रमुख पाहुणे, पालक वर्ग, प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर आव्हाळे, श्याम आंभोर, किशोर जांगडे, सुबोध जाधव, शुभम निसर्गन, संतोष आव्हाळे, अश्विनी बोजवारे, सीमा नरवडे, सीमा शिंदे, प्रीती वायकोस, सुवर्णा परभने, नितु बागिले, भारती बाविस्कर, वैशाली सूर्यवंशी, मनीषा नाडे, सविता इंगोले, ममता भोसले, पूनम गटकळ, पूजा औटे, सुरेखा थोरवे, प्राची पवार, सपना म्हस्के, सुमन जाधव, प्रमिला मगर, मुक्ता शेंडगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा नरवाडे, प्रीती वायकोस व ममता भोसले यांनी केले. मुख्याध्यापक प्रवीण आव्हाळे यांनी आभार मानले.