
छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी परिसरातील सक्सेस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना एका सोहळ्यात निरोप देण्यात आला.
सक्सेस इंटरनॅशनल स्कूल शाळेतील इयत्ता दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. शाळेची ही दहावी बॅच आहे. आजपर्यंत शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.
निरोप समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपचे नेते विश्वनाथ स्वामी, डॉ सारंग गाडेकर (फुलंब्री), छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठाचे उपसंचालक विक्कीराजे पाटील, धुळ्याचे शिक्षणाधिकारी राकेश साळुंके, जैस्वाल, घोडके, हत्तेकर, रवी लोखंडे, मंजू लोखंडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप लगामे पाटील, संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका विजयश्री बारगळ, संस्थेचे उपाध्यक्ष वेदांत पाटीलयांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी व पुढील करिअर विषयी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक वाघचौरे, डमरे, राऊत, राठोड, मोरे, जैस्वाल, मोसीन शेख, काळे, फातिमा यांनी परिश्रम केले. सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपले शाळेविषयी मनोगत व्यक्त केले व शाळेला धन्यवाद दिले.