
धुळे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिरपूर येथे १९ फेब्रुवारी रोजी बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा संकुल शिरपूर येथे आमंत्रित बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे.
किसान विद्या प्रसारक संस्था, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना, केव्हीपीएस बॉक्सिंग क्लब आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित नवोदित युवा बॉक्सिंग खेळाडूंना बॉक्सिंग या ऑलिम्पिक खेळाचे व्यासपीठ मिळावे व राज्य राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्राविण्य मिळावे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. एकदिवसीय बॉक्सिंग स्पर्धेत कब, कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनियर युथ या वयोगटातील मुले-मुली अमरावती, नाशिक, धुळे, नंदुरबार, शिंदखेडा व विविध बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे १०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. बॉक्सिंग स्पर्धेत विजयी खेळाडूंना प्रमाणपत्र,मेडल उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी देण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बॉक्सिंग स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे, उपाध्यक्ष कैलास जैन, सहसचिव डॉ लिंबाजी प्रताळे, खजिनदार राजेंद्र बोरसे, संघटनेचे किशोर पाटील, योगेश पाटील यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी केव्हीपीएस क्लबचे बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे तांत्रिक अधिकारी ऋषिकेश अहिरे, प्रा भरत कोळी, सचिव मयूर बोरसे हे परिश्रम घेत आहेत.