
परभणी : परभणी शहरातील गांधी पार्क येथील रहिवासी तथा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ. भास्करराव अंबादासराव पाठक यांचे १६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून ते सेवानिवृत्त झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी निवृत्त प्राध्यापिका नलिनी पाठक, एक मुलगा, सून, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते महावितरणचे निवृत्त अभियंता सुधाकर पाठक यांचे ज्येष्ठ बंधू व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पर्यवेक्षक आनंद पाठक यांचे ते वडील होत.
परभणी येथील अनेक मान्यवरांनी डॉ भास्कर पाठक यांचे अंत्यदर्शन घेतले. अतिशय सुस्वभावी, मृदुभाषी आणि संयमशील असलले डॉ भास्कर पाठक यांच्या निधनाने परभणीतील अनेक लोक हळहळ व्यक्त करत आहेत.