ईईपीसी इंडियाच्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशनला ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार

  • By admin
  • February 19, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला (इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया) ईईपीसी इंडियाच्या ५४ व्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी पुरस्कारांमध्ये कृषी यंत्रसामग्री आणि साहित्य मोठे उद्योग श्रेणीमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रतिष्ठित स्टार परफॉर्मर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यात वाढीसाठीच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जैन इरिगेशनला मिळाला. जागतिक स्तरावर कृषी तंत्रज्ञानात नावीन्य, गुणवत्ता व उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशनची वचनबद्धता अधोरेखित करणारा हा पुरस्कार आहे. शाश्वत कृषी उपाय आणि निर्यात उत्कृष्टतेमध्ये कृषी नव उपक्रमांना चालना देण्यासाठी जैन इरिगेशनचे स्थान आणखी मजबूत करणारा हा पुरस्कार म्हणता येईल.

दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या हस्ते जैन इरिगेशनचे बँकिंग व वित्त विभागाचे उपाध्यक्ष पियुष कुमट व संजय शर्मा यांनी जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष पंकज चढ्ढा यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *