
ऋषिकेश नायर, श्रीनिवास लेहेकर, दिव्यम राज, रोनक पारेखची चमकदार कामगिरी
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने सीडीए संघावर चार विकेट राखून विजय साकारत आगेकूच केली. ऋषिकेश नायर याने सामनावीर किताब संपादन केला.
बरणे अकादमी मैदानावर हा सामना झाला. सीडीए संघाने प्रथम फलंदाजी करताना ४३.३ षटकात सर्वबाद १५१ धावा काढल्या. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात ४४.५ षटकात सर्वबाद १८३ धावा फटकावत पहिल्या डावात ३२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. सीडीए संघाने दुसऱ्या डावात ५६.४ षटकात सर्वबाद १७८ धावा काढल्या. छत्रपती संभाजीनगर संघाने २३.३ षटकात सहा बाद १४७ धावा फटकावत चार विकेट राखून सामना जिंकला.

या सामन्यात जीआरडी (८२), रोनक पारेख (८२), सागर पवार (५२) यांनी शानदार अर्धशतके ठोकली. गोलंदाजीत दिव्यम राज (६-३२), श्रीनिवास लेहेकर (५-३६), ऋषिकेश नायर (४-२२) यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली.
संक्षिप्त धावफलक : सीडीए संघ : पहिला डाव : ४३.३ षटकात सर्वबाद १५१ (जीआरडी ८२, फरहत खान २०, रोनक पारेख ३२, ऋषिकेश नायर ४-२२, योगेश चव्हाण ३-४५, महेश दसपुते १-२२, श्रीनिवास लेहेकर १-५).
छत्रपती संभाजीनगर : पहिला डाव : ४४.५ षटकात सर्वबाद १८३ (सागर पवार ४८, आदर्श जैन ११, सूरज गोंड १४, स्वप्नील चव्हाण ७, हरिओम काळे १५, ऋषिकेश नायर १९, आकाश विश्वकर्मा नाबाद १७, योगेश चव्हाण २६, दिव्यम राज ६-३२, कुणाल त्रिपाठी ३-४२, अतुल चौधरी १-३१).
सीडीए संघ : दुसरा डाव : ५६.४ षटकात सर्वबाद १७८ (ऋषभ पारेख १७, संकिर्णा पाटील ३५, निनाद ९, रोनक पारेख ८२, फरहत खान ८, श्रीनिवास लेहेकर ५-३६, ऋषिकेश नायर ३-५०, सागर पवार १-०, आनंद ठेंगे १-२३).
छत्रपती संभाजीनगर : दुसरा डाव : २३.३ षटकात सहा बाद १४७ (सागर पवार ५२, आकाश विश्वकर्मा ८, सूरज गोंड ३४, हरिओम काळे ९, ऋषिकेश नायर नाबाद १९, आनंद ठेंगे १६, स्वप्नील चव्हाण नाबाद २, दिव्यम राज ३-५५, अतुल चौधीर १-१७, कुणाल त्रिपाठी १-४०, फरहत खान १-३१). सामनावीर : ऋषिकेश नायर.