
झारखंड, मध्य प्रदेश संघाची चमकदार कामगिरी
नागपूर : आरोही क्लासिक बॉडीबिल्डिंगतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोही क्लासिक बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद मिळवले. झारखंड संघ विजेता ठरला. मध्य प्रदेश संघाने सर्वाधिक सुवर्णपदकांची कमाई केली.
आरोही क्लासिक बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष होते. या स्पर्धेत सुमारे २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली, मुंबई, पुणे, छत्तीसगड, गुजरात, झारखंड या राज्यातील खेळाडूंनी विशेष लक्ष वेधून घेतले.
मध्य प्रदेश संघाने सर्वाधिक सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र आणि तिसऱ्या स्थानावर गोवा संघ राहिला. या प्रसंगी प्रशिक्षक राहुल सरीन, किशन तिवारी, निवेद शेतकर, रवी परसेकर, दानिश खान यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यासाठी पाल फिटनेस, एस एन फिटनेस, ईशान फिटनेस, मॉन्स्टर फिटनेस, सिंह फिटनेस, विराज फिटनेस आणि अरेना जिम यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ मेघना तिडके यांच्या अरोमा हर्बलच्या वतीने महिला फिटनेस श्रेणीसाठी विशेष पुरस्कार देण्यात आला. प्लॅटिनम न्यूट्रिशन आणि एरिक न्यूट्रिशन यांच्या वतीने २ लाखांपेक्षा अधिक सप्लीमेंट्स आणि न्यूट्रिशन स्टॅक्स वाटप करण्यात आले. मध्य प्रदेशमधून बादल शर्मा, सफायत उल्ला आणि अनिरुद्ध यांचे विशेष योगदान होते.
मिस्टर वर्ल्ड मंगेश गावडे, दर्शना जाधव यांच्या हिंदवी स्वराज, छावा महाबली हनुमान, जय श्रीराम या विशेष प्रस्तुति होत्या. स्पर्धेचे आयोजन मिस वर्ल्ड अल्फिया शेख आणि मिस्टर इंडिया कांतिश हाडके यांनी केले. व्यवस्थापन टीमचे प्रमुख कुलदीप चिकाने आणि मनीषा धमदे यांनी यशस्वी आयोजन केले.