
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेतर्फे भगवे ध्वजसोबत सायकल रॅली काढण्यात आली.
या सायकल रॅलीत महिला, तरुण मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायकल रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचे पारंपारिक वेश परिधान करून सहभागी झालेले बालसा यकलपटू स्वराज कोल्हे, अर्निका कचेश्वर, मनप्रीत कौर संघा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
सायकल रॅलीचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. सायकल रॅली सेव्हन हिल उडान पूल खालील सायकल बेट ते क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व सेव्हन हिल असा होता. रॅलीमध्ये ५० सायकलपटूंनी सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ पारंपारिक वेश प्रधान केलेले सायकलपटूंना बक्षिसे देण्यात आले.
या सायकल रॅलीमध्ये जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरणजित सिंग संघा, अमोघ जैन, अतुल जोशी, रवींद्र जोशी, अनय जैन, प्रसाद जोशी, सुनील कोंडेवार, आकाश टाके, सतिश अन्वेकर, सोम पाटील, अमोल सोमवंशी, अनिल सुलाखे, किशोर दिनकर, हरिश्चंद्र मात्रे, मनीष जैन, आशिष अस्वर, अंकुश केदार, संतोष हिरेमठ, पोपट आळंजकर, अशोक साळुंके, प्रकाश गिरी, सोमनाथ शिंदे, सोनम शर्मा, अजय पांडे, गिरीश गोडबोले, राहुल गोकलांनी, पराग लिगदे, श्रीनिवास लिगदे, अमेय कुलकर्णी, महेश काळे, स्नेहल जाजू, स्वराज कोल्हे, यशराज कोल्हे, चांगदेव माने, विकास पाटील , सार्थक राजुरे, योगेश कोल्हे, सहभागी झाले होते.