
मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी सब ज्युनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा भरवण्यात येणार आहे. १ मार्च रोजी ही प्रतिष्ठेची स्पर्धा एमसीए ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादर येथे होणार आहे.
या स्पर्धेत युवा खेळाडूंना आपली कौशल्य सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. १२ वर्षांखालील मुले व मुली (कॅडेट एकेरी) आणि १४ वर्षांखालील मुले व मुली (सब-ज्युनियर एकेरी) असे एकूण चार गटांमध्ये सामने खेळवले जातील.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी आपली नोंदणी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ दरम्यान करावी. नोंदणीसाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, राजा राणी चौक जवळ, माहीम, मुंबई 400016 येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुंबईतील अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून, भविष्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅरमपटू घडवण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व युवा कॅरमपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.