
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ
पुणे : महाराष्ट राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागीय अध्यक्षपदी सातारचे आर वाय जाधव यांची तर सचिवपदी सांगलीचे सचिन हरोले यांची एकमताने निवड करण्यात आली.
ही निवड कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील कार्यकारीणी पदाधिकारी, सदस्यांच्या सभेत करण्यात आली. यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर हे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी निवडणूक निरीक्षक पिंपरी चिंचवड महानगरचे सचिव राजेंद्र पितळीया, कोल्हापुर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन श्रीराहुल पवार, कोल्हापूर जिल्हा व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस डी लाड, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष डाॅ डी एस घुगरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त एस व्ही सूर्यवंशी, महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष आर डी पाटील हे उपस्थित होते. या सर्वानी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूरच्या न्यु काॅलेज सभागृहात झालेल्या या सभेत क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयाच्या सद्यस्थिती व भविष्यातील करावयाच्या कार्याबाबत शरदचंद्र धारूरकर यांनी महासंघाची भूमिका मांडली. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कळंबे, नवीन निवड झालेल्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात
आला.
संघटनेची नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष आर वाय जाधव (सातारा), कार्याध्यक्ष अजय शिंदे (सिंधुदुर्ग), उपाध्यक्ष महेंद्र भोसले (सातारा), महेश सूर्यवंशी (कोल्हापूर), संजीव मोरे (रत्नागिरी), मारुती माने (सिंधुदुर्ग), जितेंद्र पाटील (सांगली). कोषाध्यक्ष संदीप पाथरे (कोल्हापूर). सचिव सचिन हरोले (सांगली), सहसचिव राजेंद्र माने (सातारा). संघटक : उदयराज कळंबे (रत्नागिरी), सयाजीराव पाटील (कोल्हापूर), यशवंत गायकवाड (सातारा), सुधाकर माने (सांगली), अजय सावंत (सिंधुदुर्ग).
राज्य प्रतिनिधी : आर डी पाटील (कोल्हापूर), मनोहर यादव (सातारा). महिला आघाडी : साक्षी नलावडे (रत्नागिरी), अलका पाटील (कोल्हापूर), योगिता परमणे (सांगली), उमा भेंडीगिरी (कोल्हापूर). कार्यालयीन सचिव : युवराज माने (रत्नागिरी).
निमंत्रित सदस्य : सुदीन पेडणेकर (सिंधुदूर्ग), राजेंद्र बुवा (कोल्हापूर), आर एल पाटील (कोल्हापूर), संतोष देशमुख (सातारा), अमोल सूर्यवंशी (सांगली), निलेश बागडी (रत्नागिरी), अमित शिंत्रे (कोल्हापूर), शहाजी खरमटे (सांगली), संजय मोरे (कोल्हापूर), संतोष तावडे (सिंधुदुर्ग).