
फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी येथे सामने रंगणार
पुणे : फर्ग्युसन कॉलेज यांच्या वतीने व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या सहकार्यांने आयोजित एमएसएलटीए फर्ग्युसन कॉलेज पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज १६ वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरांतून १५० हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमीत पार पडणार आहे.
स्पर्धेचे संचालक संग्राम चाफेकर यांनी सांगितले की, ‘या स्पर्धेत महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या ठिकाणांहून १५० हून अधिक खेळाडू झुंजणार आहेत. ही स्पर्धा १६ वर्षांखालील मुले व मुलींच्या एकेरी गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
खेळाडूंचे मानांकन
मुले : १. मनन अग्रवाल (महाराष्ट्र), २.आराध्य म्हसदे (महाराष्ट्र), ३. मनन राय (महाराष्ट्र), ४. वरद उंद्रे (महाराष्ट्र), ५. वीरेन सूर्यवंशी (महाराष्ट्र), ६. मलय मिंजरोला (गुजरात), ७. अगस्त्य चौधरी (गुजरात), ८. नीव गोगिया.
मुली : १. साजी जैन (मध्य प्रदेश), २.स्वानिका रॉय (महाराष्ट्र), ३. ऋषिता पाटील (महाराष्ट्र), ४. वृंदिका राजपूत (महाराष्ट्र), ५. प्रार्थना खेडकर (महाराष्ट्र), ६. नलयाझिनी के (तामिळनाडू), ७. मित्रविंदा सतीश (तामिळनाडू), ८. तेजस्वी मानेनी (तेलंगणा).