
छत्रपती संभाजीनगर : बारा वर्षांखालील एमएसएलटीए वूड्रिज राष्ट्रीय चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत दुहेरीत केशव व तनुज संचेती आणि इशिता पाटील व संवी गोसावी यांनी विजेतेपद पटकावले.
बारा वर्षांखालील मुले व मुलींची राष्ट्रीय टेनिस स्पर्धा वूड्रिज शाळेच्या टेनिस कोर्टवर झाली. या स्पर्धेत ६० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा एमएसएलटीए, वूड्रिज आणि ग्रॅण्डमास्टर कंपनी यांच्या संयोजनांनी आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत दुहेरी गटाचे अंतिम सामने खेळवण्यात आले. मुलांच्या दुहेरी गटात केशव भैय्या (सोलापूर) आणि तनुज संचेती (सोलापूर) या जोडीने सामान्यू जैन आणि इव्हान जैन (जळगाव) या जोडीचा ६-१, ६-० अशा फरकाने पराभव करून विजेतेपद मिळविले. मुलींच्या गटात इशिता पाटील (पुणे) आणि संवी गोसावी (पुणे) या जोडीने श्रीनिधी कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर) आणि सारा भाटिया (मुंबई) यांचा ६-२, ५-७, १०-८ अशा अटीतटीच्या सामन्यात पराभव करून विजेतेपद मिळविले.
मुलांच्या एकेरीत केशव भैय्या (सोलापूर) आणि आर्य पवार (सोलापूर) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. तसेच मुलींचा अंतिम सामना छत्रपती संभाजीनगरची रिया कुलकर्णी आणि नाशिकची भूमी भालेराव यांच्यात होणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना गौर माछर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या प्रसंगी वूड्रिज हायस्कूलचे अध्यक्ष दीपक कोठारी, टूर्नामेंट आयोजक विशाल औटे आणि स्पर्धेचे सुपरयाझर प्रवीण गायसमुद्रे आदी उपस्थित होते.