
एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा विविध खेळांत मोठा सहभाग
छत्रपती संभाजीनगर : एमआयटी महाविद्यालयात कलाविहंगम क्रीडा महोत्सवाला शुक्रवारी थाटात प्रारंभ झाला. विविध क्रीडा प्रकारात एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
एमआयटी क्रीडा संकुल परिसरात सात दिवस रंगणाऱ्या कलाविहंगम क्रीडा महोत्सवात क्रिकेट, बास्केटबॉल, कबड्डी, लॉन टेनिस, व्हॉलिबॉल, अॅथलेटिक्स, कॅरम, बुद्धिबळ, खो-खो, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, आर्म रेसलिंग या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ निलेश पाटील, प्रा सचिन लोमटे, डॉ अमित रावते, डॉ पंकज झीने, डॉ अशोक खेचे, डॉ राहुल मापारी, पंकज घोडके, प्रवीण लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत खेळाचे महत्व सांगितले.
संचालक डॉ निलेश पाटील म्हणाले की, ‘खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो. अशा प्रकारच्या स्पर्धा केवळ शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठीच नव्हे तर नेतृत्वगुण व शिस्त अंगी बाणवण्यासाठी देखील महत्त्वाच्या असतात.’ या स्पर्धेमुळे महाविद्यालयात उत्साही वातावरण निर्माण झाले असून विविध शाखांमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.
शारीरिक शिक्षण संचालक डॉ प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन चांगले व्हावे यासाठी समन्वयक नेमण्यात आले आहेत. त्यात आशिष पवार, सार्थक सुरडकर (क्रिकेट), शुभम गव्हाणे, आर्यन हेडाऊ (बास्केटबॉल), ओंकार शिंदे, राहुल शेळके (कबड्डी), निरंजन गायकवाड, सागर राठोड (लॉन टेनिस), धीरज बडे, ऋषिकेश पाटील (व्हॉलिबॉल), आर्यन निर्मल, रुकेश यादव (अॅथलेटिक्स), रोहित जोंधळे, अभिजित खोंडकर (कॅरम), वीरेंद्र क्षीरसागर, अभिषेक मुकणे (बुद्धिबळ), विशाल राठोड, स्वप्नील राठोड (खो-खो), साहिल पाटील, नरसिंह राजपूत (फुटबॉल), रोहित जोंधळे, यश जैस्वाल (टेबल टेनिस), अपूर्व खोब्रागडे, तनिषा सोनवणे (बॅडमिंटन), संस्कार शिरसाठ (आर्म रेसलिंग) यांचा समावेश आहे.
याशिवाय विलास त्रिभुवन, प्रीतेश चार्ल्स, किशोर गाडगे, आशिष पवार, सागर राठोड, स्वप्नील राठोड, विशाल राठोड, अमित पवार, अभिजित खोंडकर, रुकेश यादव हे या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत.