श्रीनिधी फायनान्शियल्सतर्फे रविवारी अर्थविषयक संवाद सेमिनार

  • By admin
  • February 22, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर :श्रीनिधी फायनान्शियल्स या अर्थ विषयक सेवा देणाऱ्या कंपनीतर्फे रविवारी (२३ फेब्रुवारी) एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 

रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल कीज (द ऑरीज) या ठिकाणी रविवारी सकाळी १०.५५ वाजता सेमिनारला सुरुवात होणार आहे. या सेमिनारमध्ये अर्थ क्षेत्रातील तज्ज्ञ गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. या संवादात्मक सेमिनारमध्ये श्रीनिधी फायनान्शियल्सचे प्रमुख राजेंद्र परोपकारी, एनजे वेल्थचे क्षेत्रीय व्यवस्थापक समीर कुलकर्णी, एनजे इन्शुरन्स ब्रोकर्सचे व्यवस्थापक श्रेयस मुरुमकर, डीएसपी म्युच्युअल फंडचे व्यवस्थापक मयूर वैष्णव हे अर्थ विषयक अनेक प्रश्नांची उकल करणार आहेत. 

बजेट नंतर अर्थव्यवस्थेची प्रगती, विविध अॅसेट क्लासचे महत्व, सल्लागाराची जबाबदारी, भारतीय गुंतवणूकदारांची भूमिका, विविध अंगी गुंतवणूक चांगली की विशिष्ट क्षेत्राची, म्युच्युअल फंडाचे भवितव्य, सुरक्षा आणि जोखीम, इंडेक्स फंडाचे कार्य, स्मार्ट बेटा फंड म्हणजे काय, पीएमएस म्हणजे काय, सर्वांकष विमा का घ्यावा, क्लेम मिळण्यात येणाऱ्या अडचणी, वाढत्या प्रीमियमवर उपाय, स्वस्त टर्म इन्शुरन्स, विमा कंपन्यामधील स्पर्धा, टासा म्हणजे काय, ऑनलाईन बाजाराचे फायदे तोटे, पीए  पॉलिसी स्वस्त का मिळते, टॉप अप प्लॅन फायद्याचा असतो का? अशा अनेक मुद्द्यावरील चर्चे द्वारे श्रोत्यांच्या शंकाचे समाधान करण्यात येईल.

या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सार्थक सेलिब्रेशन्स या प्रसिद्ध इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे करण्यात आले आहे. रविवारी हा कार्यक्रम सकाळी १०.५५ वाजता हॉटेल कीज (द ऑरीज) स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू होईल. इच्छुकांनी ओंकार परोपकारी (8149012230) आणि अभिजित टाकळकर (9769976423) यांना संपर्क करावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *