
विहान लड्डा सामनावीर, शिवजित इंदुलकर मालिकावीर
कोल्हापूर : करवीर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत व्हिजन क्रिकेट अकादमी संघाने अंतिम सामन्यात प्रतीक स्पोर्ट्स संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकावले.
करवीर तालुका क्रिकेट संघटनेतर्फे दोन दिवसीय सामन्यांच्या करवीर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केडीसीएचे माजी अध्यक्ष व माजी खासादर संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पारितोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केडीसीएचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर व उपाध्यक्ष शीतल भोसले यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमास केडीसीएचे संचालक केदार गयावळ, करवीर तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जनार्दन यादव, केडीसीएचे सहसचिव कृष्णा धोत्रे, करवीर तालुका क्रिकेट संघटनेचे सदस्य अभिजीत यादव, विजय यादव, माजी क्रिकेटपटू राजेश पास्ते, संग्राम सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी केडीसीएच्या संचालक व पंच ज्योती काटकर, संतोष डोकरे, प्रशिक्षक युवराज पाटील, प्रतीक जामसांडेकर स्कोअरर रीत्विक कांबळे, ग्राउंड्समन अक्षय व प्रतीक, खेळाडू व पालक उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
अंतिम सामना सामनावीर : विहान लड्डा (व्हिजन स्पोर्ट्स अकॅडमी)
फलंदाज : आयुष चाळके (वेद स्पोर्ट्स)
गोलंदाज : प्रीतम दिवटी (वेद स्पोर्ट्स)
यष्टीरक्षक : अखिलेश पाटील (मेरी वेदर वॉरियर्स)
मालिकावीर : शिवजित इंदुलकर (प्रतीक स्पोर्ट्स)