
केरमंशाह, इराण : आशियाई आइस स्टॉक चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय आइस स्टॉक स्पोर्ट्स संघाने एक अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना छत्रपती संभाजीनगरच्या प्रणव तारे याने शानदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत १३ आशियाई देशांमधील अव्वल खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करताना प्रणव तारे याने अतुलनीय कौशल्य, रणनीती आणि दृढनिश्चय दाखवून आइस स्टॉक आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले.
प्रणव तारे, क्रांतीकुमार पाटील, महेश राठोड, धनजी अय्यर, प्रविंद्रसिंह चौधरी, श्रीकांत सोमासे आणि विनायक चोथे यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली.
आइस स्टॉक स्पोर्टमध्ये भारतासाठी हे पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकणारा प्रणव तारे हा मराठवाडा विभागातील पहिला खेळाडू ठरला आहे.