
सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघातर्फे निवेदन
सोलापूर : दहावी आणि बारावी ग्रेस गुणासाठी ‘आपले सरकार ॲप’ मधील अठरा त्रुटी रद्द कराव्यात अशी मागणी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघाने केली आहे. या मागणीचे निवेदन महासंघ पदाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांना दिले आहे.
सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांना दहावी, बारावी ग्रेस गुणातील ‘आपले सरकार’ या ॲप मधील १८ अनावश्यक त्रुटी रद्द कराव्यात याबाबतचे निवेदन सोलापूर शहर जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा सचिन गायकवाड, शहर अध्यक्ष प्रा संतोष खेंडे, शहर सचिव सुहास छंचुरे यांनी दिले.
या प्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार, क्रीडा अधिकारी नदीम शेख, सोलापूर महासंघाचे उपाध्यक्ष गंगाराम घोडके, वसीम शेख, सहसचिव श्रीधर गायकवाड, नावेद मुन्शी, मारुती घोडके, शिवानंद सुतार, धनंजय धेंडे, संतोष पाटील, विठ्ठल सरवदे हे उपस्थित होते.
अॅपमधील प्रमुख त्रुटी
- स्कूल कोड मध्ये यु-डायस कोड किंवा इंडेक्स नंबर यापैकी एक असावे.
- विद्यार्थ्याच्या पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी ,जेंडर, वय जन्मतारीख, शाळेचा पत्ता, शाळेचे पिन कोड, टेलीफोन नंबर, विद्यार्थ्यांचा पिनकोड, कॅटेगरी, सब कॅटेगिरी, डिलिव्हरी मोड या गोष्टींची काहीही आवश्यकता नाही.
- ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर एडिट करण्याची सोय असावी.
- आट्यापाट्या, वुशू, क्रिकेट, थ्रोबॉल, सेपक टकरा हे पाच खेळ समाविष्ट करावे.
- ‘आपले सरकार’मध्ये फक्त एकच फॉर्मेटमध्ये एकच फॉर्म असावा.
या सर्व त्रुटींबद्दल महासंघ पदाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर तुमचे निवेदन राज्य क्रीडा आयुक्त व राज्य पुणे बोर्ड यांना पाठवण्यात येईल असे आश्वासन नरेंद्र पवार यांनी दिले.
महासंघाने सोलापूर व महाराष्ट्रातील क्रीडा शिक्षकांना येणाऱ्या ग्रेस गुणाबाबतच्या अडचणी या निवेदनाद्वारे दूर करून ग्रेसगुणांचे फॉर्म सहज व सोप्या शब्दात उपलब्ध होईल याची दखल घेतली.