
दुबई : दिल के अरमा आंसुओं में बह गए…अशा शब्दांत पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक याने आपली भावना व्यक्त केली.
संपूर्ण सामन्यात कधीही असे वाटले नाही की पाकिस्तान हा सामना जिंकू शकेल. २४१ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर, पाकिस्तानची गोलंदाजीही फारशी कामगिरी करू शकली नाही. विराट कोहलीने त्याचे ८२ वे आंतरराष्ट्रीय आणि ५१ वे एकदिवसीय शतक झळकावले. पाकिस्तान संघाच्या पराभवावर माजी पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकने ‘दिल के अरमा आंसुओ में बह गए…’ हे गाणे गाऊन संघाची खिल्ली उडवली, तर त्याच्यासोबत बसलेल्या महिला सादरकर्ती हिने सांगितले की आता ही सवय झाली आहे.’
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब अख्तरने टीव्ही स्टुडिओचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात शोएब मलिक बसला आहे. जेव्हा अख्तरने मलिकला पाकिस्तानच्या पराभवाबद्दल विचारले तेव्हा शोएब मलिकने गाणे गाऊन त्याच्या संघाची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. त्याने ‘दिल के अरमा आंसू में बह गये’ हे बॉलिवूड गाणे गायला सुरुवात केली. आता मला सवय झाली आहे, महिला सादरकर्तीनेही पाकिस्तान संघाची चेष्टा केली.
भारतावर पाकिस्तानच्या विजयानंतर, पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान म्हणाला की त्यांनी नाणेफेक जिंकली पण त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. त्याने कबूल केले की टीम इंडियाने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि विराट कोहली आणि शुभमन गिल या फलंदाजांनी त्यांच्याकडून सामना हिरावून घेतला.