
संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित संत कबीर विद्यालय नक्षत्रवाडी येथे शिवजयंतीनिमित्त तीन दिवसीय सेल्फ डिफेन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर फक्त मुलींसाठी घेण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्षा विठाबाई माधवराव बोरडे, उपाध्यक्ष कमलेश माधवराव बोरडे व सचिव अॅड धनंजय माधवराव बोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यालयाचे मुख्याध्यापक गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानराज वारकरी बहुउद्देशीय संस्था व मिशन मार्शल आर्टस् अँड वूशू कुंगफू स्पोर्ट्स कराटे असोसिएशन व परफेक्ट मातोश्री कम्प्युटर्स यांच्या वतीने शिवजयंती निमित्त सेल्फ डिफेन्स शिबिराचा समारोप झाला.

या समारंभासाठी महानगरपालिकेचे उपायुक्त अंकुश पांढरे, महापालिकेचे शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, लहुजी साळवे आरोग्य केंद्राचे डॉ दिवाकर कुलकर्णी, संत कबीर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस बी पवार, हभप अनिल कोळेकर, मिशन मार्शल आर्ट्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष पवन घुगे, मिशन मार्शल आर्ट्स असोसिएशनचे सचिव प्रवीण घुगे, परफेक्ट कम्प्युटरचे संचालक गौतम जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संत कबीर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रमुख अतिथींना संविधान प्रत भेट स्वरूपात देण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी कराटे प्रशिक्षण डेमो सादर केला.
या प्रसंगी अंकुश पांढरे, भारत तीनगोटे, दिवाकर कुलकर्णी, एस बी पवार, पवन घुगे, प्रवीण घुगे, अनिल कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गव्हाणे यांनी महिलांसाठी कराटे प्रशिक्षणाची आवश्यकता याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पिराजी कमले, मधुकर कोळेकर, खान राफेक मोहम्मद, गोजुमुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल एम कुलकर्णी यांनी केले. के एस सिंग यांनी आभार मानले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.