
मुंबई शहर तालीम संघाच्या पैलवानांचा शानदार ठसा
पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आयोजित वरिष्ठ गट राज्यस्तरीय ग्रीको रोमन अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व पहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यातील लोणीकंद येथे २२ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पार पडली. या स्पर्धेत मुंबई शहर तालीम संघाच्या पैलवानांनी दमदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
९७ किलो गटात मुंबई शहर तालीम संघाचा पैलवान बालाजी मेटकरीने सुवर्णपदक पटकावून आपल्या कुस्ती कौशल्याची चमक दाखवली. तर ८२ किलो गटात अनिकेत जाधवने रौप्य पदक जिंकून संघाच्या यशात भर टाकली. याशिवाय ७७ किलो गटात हर्षवर्धन पाटीलने कांस्यपदक जिंकत संघाला आणखी एक सन्मान मिळवून दिला.
मुंबई शहर तालीम संघाच्या वतीने या सर्व पैलवानांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांची मेहनत, जिद्द आणि संघर्ष मुंबईच्या कुस्ती परंपरेला गौरवशाली बनवणारे आहे. या यशस्वी पैलवानांनी भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करावी, अशी संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.