
सोलापूर : दहावी आणि बारावी खेळाडू विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ग्रेस गुणांबाबत ‘आपले सरकार’ अॅपमधील सर्व त्रुटी रद्द करण्यात याव्यात या मागणीवर राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भात योग्य निर्णय घेऊ असेआश्वासन दिले.
भरणेवाडी येथे सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा सचिन गायकवाड, शहर अध्यक्ष प्रा संतोष खेंडे, सचिव सुहास छंचुरे, उपाध्यक्ष गंगाराम घोडके, सहसचिव श्रीधर गायकवाड, प्रशांत शिताप यांनी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली व त्यांना आपले सरकार अॅपमधील ग्रेस गुणांसंदर्भातील त्रुटी करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सर्व त्रुंटीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले. या संदर्भात मुंबईत निर्णय घेऊ असे क्रीडा मंत्री यांनी सांगितले.